Ads

कु.अक्षता पोहाणे झाली सीए

(वरोरा) :-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील अक्षता प्रकाश पोहणे हिने २६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झालेल्या निकालात सनदी लेखापाल (सीए ) फायनल परीक्षा उत्तीर्ण केली.
Ms. Akshata Pohane became a CA.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अक्षताचे वडील व्यावसायिक असून, आई गृहिणी आहेत. कु.अक्षता हिने आपले दहावी - बारावी शिक्षण वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. सीए अभ्यासक्रमाची तयारी सुद्धा नागपूरमध्ये राहून पूर्ण केली.
परिणामाची कुठलीही तमा न बाळगता केलेल्या अथक परिश्रमातून व संघर्षातून यशस्वी वाटचाल करत तिने हे यश प्राप्त केले. कु.अक्षताच्या यशात त्यांचे पालक मुख्य आधारस्तंभ ठरले. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि विश्वासामुळे अक्षता ने आत्मविश्वास ठेवून परीक्षा दिली. याच आत्मविश्वासामुळे परीक्षेत यशस्वी होऊ शकली. या यशाचे श्रेय तिने तिच्या गुरुजनांना, पालकांना दिले आहे. कु.अक्षता ने मिळवलेले यश कुटुंबासाठी आणि वरोरा शहरासाठी अभिमानास्पद आहे. तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment