Ads

जुन्या पेन्शनचा लढा तीव्र करू : आमदार सुधाकर अडबाले

चंद्रपूर : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या तसेच २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. पेन्शन मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल. लाखो कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा सरकार्यवाह म्हणून सभागृहात आवाज उठवेल, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
Let's intensify the fight against old pensions: MLA Sudhakar Adabale
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर महानगरतर्फे भवानजीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात २९ डिसेंबर रोजी चंद्रपूर महानगर अधिवेशन पार पडले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर अडबाले बोलत होते.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्‍थानी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव धोबे होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, जगदीश जुनगरी, विज्युक्ता महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, डॉ. अनिल शिंदे, विजय भोगेकर, विमाशि संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, वर्धा जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बडे, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, चंद्रपूर महानगर अध्यक्ष जयंत टोंगे, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, दिगांबर कुरेकर, भोंगळे सर, भाऊ गोरे, घोडसे सर, सौ. सीमा अडबाले, प्रमोद साळवे, मनोज आत्राम यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्‍यवरांचे लेझीम पथकाने स्‍वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार डायगव्हाणे, लक्ष्मणराव धोबे, वीतेश खांडेकर, जगदीश जुनगरी, डॉ. अशोक गव्हाणकर, रमेश काकडे, विजय भोगेकर आदींनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर प्रकाश टाकला.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व शालेय कार्याबद्दल महानगरातील कॉन्व्हेन्टमधील प्राचार्य, शिक्षकांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला.

प्रास्‍ताविक विमाशि संघ महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले यांनी केले. संचालन प्रा. प्रमोद उरकुडे, रंजना कन्नाके तर आभार जयंत टोंगे यांनी मानले. या अधिवेशनाला चंद्रपूर महानगरातील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. अधिवेशनानंतर चंद्रपूर महानगर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात महानगर अध्यक्षपदी दिगांबर कुरेकर, कार्यवाहपदी सुरेंद्र अडबाले, उपाध्यक्ष म्हणून मनोज पुलगमकर, दादाराव श्रीरामे, शकील शेख, वनश्री मेश्राम, सहकार्यवाह म्हणून प्रविण आबोजवार, चरणदास राठोड, रूपाली मुंगल, प्रमोद पेद्दीलवार तर कोषाध्यक्ष म्हणून राजू वाढई यांची अविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. विजय हेलवटे यांनी जबाबदारी पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment