जावेद शेख भद्रावती :-भारतीय कमुनिस्ट पक्षाच्या जिल्हा कौन्सिल चंद्रपूर तर्फे नुकतेच अदानी उद्योगमधील भ्रष्टाचार वाढती महागाई बेरोजगारी तसेच मणिपूर राज्यात शांतता स्थापित करण्यासाठी व इव्हिएमच्या विरोधात देशव्यापी धारणा व निदर्शने करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना शिस्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव CPI कॉम्रेड राजू गैनवार ,माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भा क पा कॉम्रेड रवीद्र उमाटे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी केले
यात नारेबाजी करून अनेक नेत्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झालीत
भाजपा विरोधात जनतेत नाराजी होती देशात अनेक ठिकाणी महिलावर आत्याचाराच्या घटना घडत आहेत महागाई व बेरोजगारी हे सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे राज्य व देशातील भाजपा सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केले इव्हीएम घोटाळया बाबत जनतेच्या मनात शंका - कुशंका निर्माण होत आहे येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात
भारतीय कमुनिस्ट पक्षा तर्फे दिनांक - 10 डिसेंबर ला देशव्यापी धारणा व निदर्शने निषेध आंदोलन करण्यात आले
0 comments:
Post a Comment