जावेद शेख भद्रावती:-धान्याची अफरातफर करून धान्य परस्पर विकणाऱ्या सागरा येथील रेशन दुकानदारावर शासनाकडून कोणतीच कारवाई न करण्यात आल्याने व त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात न आल्याने तालुक्यातील सागरा येथील सरपंच तथा गावकऱ्यांनीग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून गावकऱ्यांना अन्य धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या या रेशन दुकान धारकावर कारवाई करून त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
Villagers including the sarpanch stage a hunger strike at Sagara Gram Panchayat Chowk against the ration shopkeeper.
सागरा येथे मोतीराम मारेकर यांचे रेशनचे दुकान आहे. मात्र या दुकानातून अन्नधान्याची अफरातफर करून धान्य परस्पर विकल्या जात असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. याआधी या दुकानदाराचा धान्य अफरातफर करताना रंगेहात ट्रक देखील पकडला होता. मात्र इतके होऊनही या दुकानदाराचा परवाना अद्यापही रद्द करण्यात न आल्याने गावकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. हा दुकानदार गावकऱ्यांसोबत सतत अरेरावीची भाषा करीत असल्याचा आरोप करीत या दुकानाचा परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणास प्रभारी सरपंच शंकर रासेकर यांचेसह गावकरी बसलेले आहेत.
0 comments:
Post a Comment