Ads

घुग्गुस व चंद्रपूर येथील घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद ३,६७,६९० /- रु चा मुद्देमाल हस्तगत…

चंद्रपुर :- दिनांक १७/०१/२०२५ रोजी पोलीस स्टेशन घुग्गुस ता.जि. चंद्रपूर गु.र.नं ३६८/२०२४ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता मधील आरोपीचे संदर्भाने प्राप्त गोपनीय माहितीचे आधारे इसम न मोहम्मद सरफरोज शागीर शाह, वय २४ वर्ष, रा. रयतवारी कॉलरी, आमटे लेआउट, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन चोरीस गेले मालाबाबत व साक्षीदारासह विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा व पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत आणखी दोन घरफोड्या दोन विधी संघर्षित बालकासह केल्याची कबुली पंचा समक्ष दिली.
Local Crime Branch arrests burglary suspect
त्यानुसार सदर गुन्हयातील व इतर गुन्हयातील चोरीस गेले सोन्याचे दानिने, चांदीचे दागिने व वस्तु, गुन्हयात वापरलेली मोपेड अॅक्टिव्हा असा एकुण ३,६७,६९०/-रू माल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन घुग्गुस यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पो.स्टे घुग्गुस करीत आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा १२२७ चेतन गज्जलवार, पोहवा ८९८ जंयता चुनारकर, पोहवा ७८८ ,नितेश महात्मे, पोशि ९९ अमोल सावे, पोशि ८८७ प्रफुल्ल गारघाटे, पोशि१२३९ किशोर वाकाटे, महिला अंमलदार अपर्णा मानकर, दिपीका सोडणार, वाहनचालक दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment