Ads

दुर्गापूर येथील प्रदुषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

चंद्रपूर - गेल्या काही वर्षापासून वेकोली, चंद्रपूर क्षेत्र व महाऔष्णिक विद्युत केंद्र संयुक्तरित्या कोल हॅडलिंग प्लँट चालवित आहेत. त्या परिसरात जवळपास 10 हजार नागरिक वास्तव्य करून राहत आहेत. हे नागरिक तिथे होणाऱ्या प्रदुषणामुळे त्रस्त आहेत. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्या भागाचा दौरा करून एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत दुर्गापूर येथील प्रदुषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
Take immediate measures to reduce pollution in Durgapur
या बैठकीला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, राठोड उपमुख्य अभियंता, वेकोलीचे मुख्य महाव्यवस्थापक, प्रदुषण नियंत्रण विभागाचे अधिकारी, भाजपाचे नेते रामपाल सिंग, नामदेव आसुटकर, हनुमान काकडे, वनिता आसुटकर, श्रीनिवास जंगम, अनिल डोंगरे, सरपंच दुर्गापूर व त्या भागातील नागरिक तथा भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.

या बैठकीत बोलतांना आमदार मुनगंटीवार म्हणाले या कोल हँडलींग प्लँट जवळ एअर पोल्युशन यंत्रणा पुढील 1 महिन्यात वेकोलीने लावावी. इथली वॉटर फॉगींग सिस्टीम 24 तास सुरू ठेवावी व ती सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी तिथे सिसिटीव्ही कॅमेरे लावावे. या कॅमेऱ्यांची एक स्क्रीन तिथेच दर्शनी भागात लावावी तथा दुसरी स्क्रीन कन्ट्रोल रूम मध्ये असावी. या समस्येचे स्थायी स्वरूपात निराकरण करण्यासाठी सरकारी अधिकारी व पदाधिकारी यांची 7 ते 9 लोकांची समिती बनवावी. या समितीची नियमीत बैठक घेवून त्याचा वृत्तांत माझ्याकडे पाठवावा असे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले.या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलावीत असे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले. सर्व अधिकाऱ्यांनी या सुचनांचे पालन करून प्रदुषण कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलु असे आश्वासन या बैठकीत दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment