जावेद शेख भद्रावती :-
नाल्यातून जेसीबी, ट्रॅक्टर तथा हायवा च्या साह्याने नाल्याच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची अवैध तस्करी करीत असलेल्या रेतीमाफीयांवर धाड टाकून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रेती तस्करीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रॅक्टर, एक हायवा, एक जेसीपी व सात ब्रास वाळू सह 63 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Police take major action against sand mafia in Jena Nalaghat
सदर कारवाई भद्रावती पोलिसांकडून दिनांक 18 रोज शनिवारला पहाटे चारच्या दरम्यान तालुक्यातील जेना घाटावर करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध रेती माफीयांचे धाबे चांगलेच दणानले आहे. या घटनेतील आणखी दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झालेले आहेत. सदर जेना येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे एमएच ४० बी इ 41 88 या क्रमांकाच्या जेसीपी ने रेतीचे अवैध उत्खणन करीत असल्याचे व दोन ट्रॅक्टर व एका हायवा द्वारा रेतीची तस्करी करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी रेतीसह अन्य सर्व वाहने जप्त केली असून याप्रकरणी प्रणय अनंता पेचे वय 29 वर्षे, प्रतीक गजानन माहुरे वय 22 वर्षे, मोहम्मद फिरोज समउद्दिन सिद्दीकी वय 28 वर्षे, सुशांत मुकिंदा कुळमेथै वय 24 वर्ष या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर इतर दोन आरोपी फरार झाले आहे. या कारवाईत पोलिसांकडून 63 लाख 35000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, पी. अ. वृषभ काटकर, विठ्ठल काकडे, नांदेकर तसेच भद्रावती चे ठाणेदार अमोल काचोरे, सपोनि संजय मिश्रा, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुधरी, निकेश ढेंगे व विजय उपरे यांचे कडुन संयुक्त कारवाई करण्यात आली.
0 comments:
Post a Comment