जावेद शेख भद्रावती:-
सध्या भद्रावती तालुक्यात अवैद्य रेती व्यवसाय करणाऱ्याला ऊत आला आहे यावर अंकुश लावण्यासाठी तहसीलदार राजेश भांडारकर ॲक्शन मोडवर आहे आज दिनांक 30,1,2025 रोजी गुरुवार सकाळी साडेनऊ वाजता पटवारी अनंत गीते यांना गोपनीय माहिती मिळाली असता अवैद्य रेतीचे ट्रॅक्टर वाहतूकसुरू आहे.
Patwari who took action against illegal sand tractors gets a beating.
अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर करीत असताना पटवाऱ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या ट्रॅक्टर मालकाची तक्रार पटवारी संघटनेतर्फे शेगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. सदर ट्रॅक्टर मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पटवारी संघटनेने केली आहे. सदर घटना भद्रावतीतालुक्यातील कारेगाव गावाजवळ घडली. गुप्त माहितीच्या आधारे पटवारी अनंत गीते यांनी आपले सहाय्यक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे यांच्या सहाय्याने कारेगाव गावाजवळ रेतीने भरलेले ट्रॅक्टर अडवून विचारपूस करून परवाना मागितला. परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. मात्र दोन अज्ञात व्यक्तींनी पटवारी गीते यांना धक्काबुक्की करून रेतीने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. याची माहिती प्रथम भद्रावती येथील तहसीलदारांना देण्यात आली व नंतर शेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात धक्काबुक्की करणाऱ्या इसमांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व पुढे अशा घटना घडू नये यासाठी उपाय करावे अशी मागणी पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजुरकर यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment