Ads

एक माकड अनुसयाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित

सादिक थैम वरोरा :- तालुक्यातील पिंपळगाव (मारोती) हे गाव काहीच दिवसांपूर्वी प्रकाशाच्या झोतात आले ते या गावातील शहीद झालेल्या अक्षय निकुरे याच्या बलिदानाने. मात्र आता पुन्हा हे गाव एका वेगळ्याच घटनेमुळे परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. विषय हा एका माकडांनी दाखवलेल्या माणूसकीच्या वृत्तीचा.
Monkey's unique love seen at funeral
काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात देशाचे रक्षण करत असताना शहीद झालेल्या अक्षय निकुरे यांच्या बलिदानाचे वृत्त विरलेही नसताना या गावात एका माकडाने दाखवलेल्या आपल्या आगळ्यावेगळ्या वागणुकीमुळे चर्चेत आले आहे.
या गावातील विजय मारुती धवणे यांच्या मातोश्री अनुसया यांचे 75 व्या वर्षी काल 29 जानेवारी रोज बुधवारला सकाळी वृद्धापकाळमुळे निधन झाले. आपली आई अनुसया यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना एक माकड आले. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी होईपर्यंत ते थांबले आणि हे माकड अंत्य यात्रेसोबत स्मशानभूमीतही पोहचले.तिरडी खाली ठेवल्यानंतर माकड प्रेताजवळ आले व त्याने प्रेताच्या डोक्यावरील पदर बाजूला सारून शवाला मिठी मारली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्याने अनुसयाच्या डोळ्यावरील चष्मा बाजूला केला. अनुसया आईच्या हातातील बांगड्या ही त्याने फोडल्या आणि अनुसया च्या अंतिम संस्कार होईपर्यंत हे माकड घटनास्थळी थांबले होते. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर हे माकड सर्वांसोबत परतही फिरले अनुसया आईच्या अस्थी आणतांनाही ते माकड उपस्थित होते हे विशेष.
माकडाच्या या वागण्यामुळे गावकरी अचंबित झाले असून हे माकड अनुसयाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहिल्यामुळे तिला मोक्ष प्राप्त झाला असेल अशी गावात व नातेवाईकात चर्चा आहे. हा बजरंगबली चा चमत्कार किंवा योगायोग सुद्धा असू शकतो अशी उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment