सादिक थैम वरोरा:विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचेकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उचित न्याय मिळावा या मागणी करिता दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने प्रकल्पस्थळी 23 जानेवारी पासून सुरू असलेल्या "चूल जलाओ " आंदोलनाला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी भेट दिली व प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतली.आमदार महोदयांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या बाबत राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली.
Guardian Minister to visit Dindoda project affected people on February 1 or 2 regarding their demands
दिंडोडा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हे येत्या १किंवा २ फरवरीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन परिस्थिती समजून घेतील.
दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्ताचे 240 कोटी रुपये मोबदला मिळविण्यासाठी गेल्या २३ जानेवारीपासून चुला जलाओ आंदोलन सुरु आहे.आमदार करण देवतळे यांनी 28 जानेवारी 2025 ला सायंकाळी आंदोलनस्थळी भेट दिली व प्रकल्प ग्रस्ताच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रा. अशोक उईके यांच्याशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला आणि समस्या विषद केली. त्यांनी 1 ते 2 फरवरीला प्रकल्पाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच आमदार देवतळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीय सचिवशी देखील भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्याशी भेटायचे आहे असा संदेश दिला.
त्याअनुषंगाने दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे पदाधिकारी यांना घेऊन आमदार करण देवतळे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागपूरला रवाना झाले आहे.
0 comments:
Post a Comment