चंद्रपूर :शंभर कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेची व ५०६ कोटी रुपये किमतीच्या नवीन भूमिगत गटार योजनेच्या कामाची तसेच 234 कोटी रुपयांच्या पहिल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मनपाचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी ४ तास खड्ड्यात बसून लक्षवेधी आंदोलन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातील एका खड्ड्यात देशमुख यांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने जनविकास सेनेचे कार्यकर्ते होते.
या आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांना निवेदन देऊन 48 तासाचा अल्टीमेटम देण्यात आला. 48 तासात चंद्रपूर महानगरपालिकेतील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची लेखी हमी द्यावी, अन्यथा महानगरपालिके विरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेने दिला आहे.
जनविकास सेनेच्या आंदोलनाला अ.भा. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण खोब्रागडे, माजी नगरसेवक दिपक जयस्वाल, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर,सामाजिक कार्यकर्ते नितीन बनसोड, कुशाबराव कायरकर, किशोर जामदार, दिलीप होरे, कुसुमताई उदार,सुरेश विधाते, अरुण भेलके, मतीन शेख, ताहीर शेख, दिलीप कठाणे, लक्ष्मीकांत राजूरकर, प्रवीण चवरे, सचिन भिलकर, अविनाश आंबेकर, नागेश डोरलीकर, अरुण देऊरकर, विलास माथने विठ्ठलराव घुमडे, नवनाथ देरकर,अश्विन खोब्रागडे इत्यादींनी उपस्थिती दर्शन आंदोलनाला पाठिंबा दिला.
0 comments:
Post a Comment