राजुरा - साउथ एशिया मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशन द्वारा आयोजित प्रथम साउथ एशिया मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मंगलोर कर्नाटका South Asia Masters Athletics Championship येथील मंगला स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे सदर स्पर्धेच्या प्रथम दिवशी राजुरा येथील राष्ट्रीय खेळाडू कुमारी पूर्वा खेरकर हिने तीस वर्षावरील महिला गटात गोळा फेक क्रीडा प्रकारात रजत पदक प्राप्त करत प्रथम दिवसाची सुरुवात केली.
Bright start for the PURVA in the Asian Athletics Championships
सदर स्पर्धा 10 ते 12 जानेवारी पर्यंत चालणार असून पूर्वा हिचे उर्वरित थाळीफेक व भालाफेक क्रीडा प्रकारात पदकाच्या अपेक्षा उंचाविल्या आहे. पूर्वा हिच्या यशाबद्दल अभिनंदन देत जिल्हा मास्टर अथलेटिक संघटनेचे अध्यक्ष मारुती उरकुडे, सचिव श्री सुरेश तूम्मे, नारायण कुडे, अब्बास पठाण, प्रा. संगीता बांबोडे, वर्षा कोयचाडे, श्रीहरी गसकांती, श्री लामदेव नगलवाडे, चैताली कन्नाके, मयूर खेरकर यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment