तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-
पवित्र अजमेर शरीफ येथे दिनांक 07 जानेवारीपासून हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्ला अलेह यांच्या 813 व्या उर्स ला सुरुवात होत आहे.
या उर्स मध्ये चादर चढविण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे तर्फे पवित्र चादर अजमेर शरीफ साठी रवाना करण्यात आली.
A chadar was sent to Ajmer Sharif on behalf of MP Pratibha Dhanorkar.
वरोरा येथील धानोरकर कार्यालयात ही चादर अजमेर उर्स साठी जात असलेले भद्रावती येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सोशल मीडिया अध्यक्ष गोरु थैम यांना ही चादर चढवण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, मानस धानोरकर, पार्थ धानोरकर व प्रवीण भाऊ काकडे उपस्थित होते. देशात सुख,शांती व समृद्धी नांदावी व देशातील ऐक्य कायम राहावे अशी कामना यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केली.दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या कारकिर्दीत त्यांच्यातर्फे दरवर्षी अजमेर शरीफ येथील उर्स मध्ये चादर चढविण्यात येत होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ही चादर चढवण्याची परंपरा कायम राखली आहे.
0 comments:
Post a Comment