जावेद शेख भद्रावती:-
तालुक्यातील चपराळा येथील क्रीडांगणाचे दिनांक 29 ला मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Inauguration of the playground at Chaparala.
यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, गटविकास अधिकारी अशुतोष सपकाळ, सरपंच विलास लेडांगे, विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, भागवत मॅडम, सचिव जयश्री चंदनखेडे, कार्लेकर मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा मनरेगा अधिकारी यांची उपस्थिती होती. सदर क्रीडांगण मनरेगा अंतर्गत 22 लक्ष रुपये खर्चुन तयार करण्यात आले. याबरोबरच मनरेगा अंतर्गत 15 लक्ष रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या गावातील सीसी रस्त्याचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. गावात क्रीडांगण तयार झाल्याने याचा गावातील तरुण वर्गाला फायदा होऊन परिसरात उत्कृष्ट खेळाडू तयार होईल असा विश्वास यावेळी सरपंच विलास लेडांगे यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर सिडाम, अजय ठाकरे, मनीष बल्की, हर्षल कोंडेकर, चेतन महाकुलकर, मारुती कोंडेकर, विशाल आगलावे व अन्य सहकाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment