राजुरा 29 जानेवारी :-जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे उपविभाग स्तरावरील दौरा दरम्यान आज दिनांक 29 जानेवारी 2025 ला स्मार्ट ग्राम मंगी(बु) येथे भेट दिली व ऑक्सिजन पार्क, वनराई बंधारा, बचत गट भवन, बीज संकलन केंद्र, सौर विद्युत प्रकल्प, जलजीवन मिशन मधील कामे, सायन्स पार्क, जिल्हा परिषद शाळा इत्यादी पाहणी केली.
District Collector Vinayji Gowda visits Smart Village Mangi (Bu).
स्मार्ट ग्राम मंगी (बु) तर्फे गावचे सरपंच शंकर तोडासे यांनी जिल्हाधिकारी विनयजी गौडा यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. गावातील चालू असलेल्या विविध कामाविषयीची माहिती दिली.जिल्हाधिकारी यांनी आपल्या मनोगतात गावातील झालेल्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यात आणखी चांगले कार्य करून आपल्या गावाचे नावलौकिक करा अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी राजुऱ्याचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौंड , पंचायत समिती राजुऱ्याचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे , पंचायत समिती राजुऱ्याचे गटशिक्षण अधिकारी मनोजकुमार गौरकार, शिक्षण विस्तार अधिकारी विशाल शिंपी , केंद्रप्रमुख रामा पवार , शाळेचे मुख्याध्यापक ऋषी मेश्राम,तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा गाव विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडसाम , माजी मुख्याध्यापक भेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर झाडे , विज्ञान विषय शिक्षक यांनी केले. तर आभारप्रदर्शन नारनवरे , ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले.
0 comments:
Post a Comment