सादिक थैम वरोरा:दि. 23 जानेवारी 2025 गुरूवार ला सकाळी अकरा वाजता विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचे कडून दिंदोडा प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना उचित न्याय मिळावा या करिता दिदोंडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे वतिने दिंदोडा प्रकल्प स्थळी चुल जलाओ, धरणे, नारे निदर्शने ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे
The 'Chula Jalao Thiiya' movement of the Dindoda project victims has been going on for five days.
निवेदन कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्र.1 चंद्रपूर, मारेगाव तहसील चे तहसिलदार उत्तम निलावाड, पोलीस निरीक्षक संजय सोळंके, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांना दि. 21-1-25 रोजी देण्यात आले तसेच 17-01-25 ला तहसील कार्यालय हिंगणघाट व 20-1-25 ला मध्यम प्रकल्प विभाग चंद्रपूर यांना सुध्दा निवेदन देण्यात आले असून शासनाने 240 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा मुंबई याचेकडे प्रस्ताव मंजूर करण्याकरिता पाठविण्यात आला आहे परंतु शासनाकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही करिता 240 कोटीचा प्रस्तावास मंजुरी मिळेपर्यंत धरणाचे काम बंद करण्यात यावे करिता दिदोंडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर च्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येत असून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार बांधवांना प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यया विरोधात चुल जलाओ ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहे.या चुल जलाओ ठिय्या आंदोलन करिता काय उपाययोजना करण्यात येईल नियोजन काय आहे असा संवाद साधला असता प्रकाश गायकवाड कार्यकारी अभियंता चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्र.1 यांनी लेखी स्वरूपात अनुदान देणार आहो असे आश्वासन दिले परंतू अजुनपर्यंत कोणतीच हालचाल शसनाकडून झाली नाही जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे असे सांगण्यात आले. आंदोलनात चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ग्रस्त सहभागी झाले.
0 comments:
Post a Comment