Ads

वायगाव (तु.) येथे महिला मेळावा व हळदी-कुंकवाचा भव्य सोहळा संपन्न

भद्रावती जावेद शेख : जय हिंद फाउंडेशन, श्री जगन्नाथ बाबा विद्यालय, आणि महिला बचत गट, वायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा महोत्सव व हळदी-कुंकवाचा सोहळा नुकताच 15 जानेवारी ला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Women's gathering and grand ceremony of Haldi-kunkwa concluded at Vaigaon (Tu.)
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून वंदनेने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी सरपंच सौं.भावनाताई कुरेकार होत्या तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट स्नेहा खडके, सौं. हर्षा नागपुरे (उमेद अभियान महाराष्ट्र ), समुदाय आरोग्य अधिकारी कुमारी शुभांगी कडुकर, शिक्षिका सौं. अर्चनाताई जाधव, प्राचार्य. श्री. नंदकिशोर धानोरकर यांनी महिलांच्या आरोग्य, अर्थसाक्षरता, कायदे, स्वावलंबन, आणि बचत गटांच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व पटवून देत जय हिंद फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक केले.

महिला सक्षमीकरणाची गरज:
महिलांना समाजात आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षमी करण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. महिलांनी एकत्र येऊन आपापसांत अनुभवांची देवाण-घेवाण केली. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबनाचे धडे घेतले पाहिजेत, असे आवाहन पाहुण्यांनी केले. "अशा कार्यक्रमांमुळे आम्हाला प्रेरणा आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहण्याची ताकद मिळते," असे सहभागी बचत गटांच्या महिला आणि तंटामुक्ती महिलांनी भाष्य केले.
मकर संक्रान्तीचे औचित्य साधून महिलांसाठी पुस्तके भेटवस्तू म्हणून वाटप केले. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत सणाच्या पारंपरिक आणि सामाजिक महत्त्वावर चर्चा केली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौं. अश्विनी काकडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जय हिंद फाउंडेशन, श्री जगन्नाथ बाबा विद्यालय, आणि महिला बचत गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment