गडचांदूर:-भवानजी भाई हायस्कूल चंद्रपूर येथे 12 ते 14 जानेवारी 2025 रोजी 52 व्या जिल्हास्तरीय 'विज्ञान प्रदर्शनी'चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.'समाजाला उपयोगी विज्ञान व तंत्रज्ञान' 'Science and technology useful to society' या संकल्पनेतून अनेक प्रतिकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
त्यात राजुरा तालुक्यातील मौजा हरदोना(खुर्द)जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 7 वीची विद्यार्थ्यांनी 'कु.भारवी किशोर शास्त्रकार' यांनी 'निरुपयोगी कापडांपासून कागद तयार करणे" या विषयावर 'टाकाऊ वस्तूंपासून समाजोपयोगी टिकाऊ वस्तू' कशी तयार करावी,यावर आधरीत प्रतिकृती प्रदर्शनात ठेवली.यासाठी शिक्षिका तृप्ती वाघे(टिकले)यांचे मार्गदर्शन लाभले. भारवीच्या या प्रतिकृतीला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला आहेत.
भारवीने यापूर्वी तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत भाग घेऊन 'एकपात्री भूमिका अभिनय', या गटात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून शाळा व गावाचे नाव उंचावले असून आता पुन्हा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधी प्राप्त झाली तर ते सुध्दा कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात,हे भारवीच्या यशावरून सिध्द होते. तिची ही प्रतिकृती आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व करणार असून तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जाधव,शिक्षक मांडोगडे,शाळा व्यवस्थापन समिती,केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी,पालक,गावकरी तसेच विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment