जावेद शेख भद्रावती :-सामाजिक चळवळीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रमुख मार्गदर्शक व प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर सामाजिक कार्यकर्ता विदर्भाच्या दौऱ्यावर असून, 21 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीत येत असून प्रथमता सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांच्या निवासी जनसंपर्क कार्यालयात सकाळी दहा वाजता भेट देतील.
सकाळी 11 वाजता राजमनी गार्डन व सभागृह रेल्वे स्टेशन रोड गवराळा, भद्रावती येथे उपस्थित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी सामाजिक चळवळीतील विशेष विषय संदर्भात संवाद करतील. दुपारी अडीच वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहतील. पत्रकारांसोबत संवाद. पाच वाजता मुलकडे प्रयान कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थिती दर्शवतील अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एका पत्रकाअन्वये दिली आहे.
0 comments:
Post a Comment