राजुरा 20 :-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,बाबुपेठ चंद्रपूर येथे सन 2005 ते 2007 या कालावधीत शिक्षण घेतलेले सर्व विद्यार्थी तब्बल १८ वर्षांनी त्याचं प्रांगणात एकत्र आले. त्या कालावधीत ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शिक्षकांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी मित्र एवढ्या वर्षानी एकत्र येण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्या दोन वर्षात एकत्र घालवलेले क्षण डोळ्यांसमोर तरळू लागले, पुन्हा वाटे लहानगे व्हावे वर्गात बसावे गुरुजनांकडून शिकावे ही भावना मनात येत होती.
- Alumni reunion ceremony concluded.
सेतुपाठ सरावपाठ, श्रमसंस्कार शिबीर विविध आठवणींना उजाळा मिळाला. वसतिगृहातील घालवलेले दिवस तेथील आठवणी सुद्धा जाग्या झाल्या असा हा आगळावेगळा क्षण. आपल्या गुरुजींनी घडवलेल्या त्यांनी दिलेल्या शिकवणी ची परतफेड होती . सुमधुर असे स्वागत गीत माजी विद्यार्थी सुधीर झाडे यांनी गायिले. शाल,श्रीफळ , सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन आपल्या गुरुजनांचा सन्मान सर्व माजी विद्यार्थ्यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राजकुमार हिवारे , प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बापूपेठ चंद्रपूर हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संजीव खाडे, सेवानिवृत्त अधिव्याख्याता, काटकर सेवानिवृत्त अधिव्याख्याता आंग्लभाषा, मंजिरी देशमुख सेवानिवृत्त अधिव्याख्याता अनिरुद्ध गोवर्धन, येरणे सर, बारेकर व डायट चे कर्मचारी वृंद होते. माजी विद्यार्थी अतुल वऱ्हाडे, निलेश धावडे,विशेष चौबे,संजयकुमार श्रीखंडे,ललित बोपचे,ज्ञानेश्वर शिंदे,शिल्पा दरेकर,वर्षा रोकमवार, अनिल मावची,सुधीर झाडे व सतीश सिंगाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पुरी यांनी केले व आभार विपूल चरडुके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम सतीश सिंगाडे , सुधीर झाडे , राजीव धोटे व सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांनी घेतली.
0 comments:
Post a Comment