Ads

चंद्रपुरात रंगणार २६वा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव

चंद्रपूर : २६वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४ दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर परिक्षेत्रामध्ये आयोजित आहे. राजभवनाद्वारे या महोत्सवाचे यजमानपद गोंडवाना विद्यापीठाला मिळाले आहे. क्रीडा महोत्सवासाठी २३ विद्यापीठांमधील ३ हजार ७२३ इतकी नोंदणी झाली आहे. यामध्ये खेळाडू व संघव्यवस्थापक यांचा समावेश आहे. निमंत्रित मान्यतर, विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक असे अंदाजित ४ हजार ५०० जण या महोत्सवा मध्ये
सहभागी होतील, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
26th State Level Sports Festival to be held in Chandrapur
या महोत्सवाचा उ‌द्घाटकीय समारंभ दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता विसापूर येथील बल्लारपूर तालुका क्रीडासंकुल येथे होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन असणार आहेत; तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. महोत्सवाचे उ‌द्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके, क्रीडा व युवक तसेच अल्पसंख्याक विकास औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहतील.

*आठ खेळांचा थरार रंगणार*

महोत्सवामध्ये मुले व मुली यांचे कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स व चेस अशा आठ क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा होणार आहे. त्या सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ७ वाजता अशा दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

कबड्डी व खो-खोचे सामने आरएसएसएस, विसापूर येथे ४ मैदानांवर होणार असून, व्हॉलिबॉल आरसीईआरटी, चंद्रपूर येथे चार मैदानांवर, बास्केटबॉल चंद्रपूर, सैनिक स्कूल, विसापूर येथे चार मैदानांवर, बॅडमिंटन जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर (बॅडमिंटन हॉल), टेबल टेनिस तालुका क्रीडासंकुल, विसापूर, (बॅडमिंटन हॉल) अॅथलेटिक्स तालुका क्रीडासंकुल, विसापूर व चेस (बुद्धिबळ) आरसीईआरटी, (चंद्रपूर इन हॉल) येथे आयोजित करण्यात आलेले आहेत. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, नीलेश बेलखेडे, डॉ. प्रवीण जोगी, संजय रामगिरवार, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, अधिष्ठाता डॉ. संजय निंबाळकर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment