जावेद शेख भद्रावती :- ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संचालित स्थानिक प्रियदर्शनी खाजगी आयटीआय येथील मैदानावर पार पडलेल्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय आयटीआय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी व व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात भद्रावती येथील विविध संघांनी अजिंक्यपद पटकाविले.क्रीडा स्पर्धेसोबतच येथे एका सांस्कृतिक महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते.
Bhadravati's team dominates the district-level ITI sports competition.
सदर स्पर्धेत जिल्ह्यातील शासकीय,अशासकीय आयटीआय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकूण 16 संघाने सहभाग घेतला होता. सदर क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट या क्रीडा प्रकारात स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भद्रावती येथील श्री साई आयटीआय संघाने वरोरा येथील संभाजी सायरे आयटीआय संघाचा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. कबड्डी या क्रीडा प्रकारात भद्रावती येथील मा भवानी आयटीआय संघाने चंद्रपूर येथील श्री साई आयटीआय संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला, तर व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय संघाने भद्रावती येथील प्रियदर्शनी आयटीआय संघाचा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेच्या दरम्यान प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध आस्थापनामध्ये नियुक्तीचे पत्र सुद्धा देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला वेकोली माजरी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक प्रमोदकुमार, महाप्रबंधक(संचलन) विकास अग्रवाल, प्रा. डॉ. यशवंत घुमे, मंडळाचे अध्यक्ष तथा इंटक नेते धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, नरेंद्र गुंडावार ,चंद्रकांत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्वेताली वाकुलकर यांनी तर आभार प्राचार्य प्रविण बाळसराफ यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे निदेशक तथा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment