राजुरा :-सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने मातृ पितृ पूजन दिवस सोनिया गांधी शाळेच्या परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
Father's Mother's Day is celebrated with enthusiasm.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश तेलीवार, माजी विस्तार अधिकारी, नेफडोच्या नागपूर विभाग अध्यक्षा सूनैना तांबेकर, तालुका अध्यक्ष किरण हेडाऊ, माधुरी कुळकर्णी, मिलींद गड्डमवार, माधुरी डफाडे, कृतीका सोनटक्के, अरूणा बुटले, अंजली गुंडावार, पुजा घरोटे, संतोष देरकर, मनोज तेलीवार, मंदा सातपुते, माधुरी गड्डमवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुष्मा वडस्कर यांनी केले. प्रास्ताविक कृतिका सोनटक्के यांनी तर आभारप्रदर्शन पूजा रासेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून गीतगायन शिक्षीका प्रज्ञा वैद्य यांनी केले. विशेष अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम अन्सारी , उपप्राचार्य रफत शेख , सकाळ पाळी प्रमुख प्रमिला रोगे, सपना मानकर , नीता ब्राह्मणे , सुषमा दरेकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पितांचे व शिक्षकांचे पूजन केले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे ज्येष्ठ पदाधिकारी, सदस्य,संघटक यांचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आई - वडील, गुरू, आणि ज्येष्ठांचे मानवी जीवनातील स्थान व महत्त्व विषद केले.
0 comments:
Post a Comment