चंद्रपूर :- वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सट्टा पट्टी विरोधात छापा टाकून ४ लाख २२ हजार ८२० रुपयांचा माल जप्त केला आणि एक डझन आरोपींना अटक केली.
दिनांक १५/०२/२०२५ रोजी पोलीस अधिक्षक, मुम्मका सुर्दशन यांनी चंद्रपुर जिल्हात जुगार, प्रोव्हीशन रेड तसेच अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले. पो. नि. महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपिन मधुकर सामलवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सुनिल गौरकार व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, वरोरा परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पो.स्टे. वरोरा शहरात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात अवैधरित्या सटटा पटटी चालु आहे. सदर माहितीवरुन गुप्त माहितीच्या आधारे वेगवेगळया ठिकाणी छापा टाकून सटटा पटटी चालवि-या एकुण १२ आरोपींना ताब्यात घेवुन त्याचेवर पो.स्टे. वरोरा येथे वेगवेगळे ११ गुन्हे दाखल करून त्याचे कडुन नगदी रूपये २२,८२०/- रू. व एकुण ०८ मोटार सायकल किंमत ४,००,०००/- रू. असा एकुण ४,२२,८२०/- रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपीतांना पुढिल तपासकामी पोस्टे वरोराच्या ताब्यात देण्यात आले असून पुढिल तपास पोस्टे वरोरा करीत आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपिन मधुकर सामलवार, पोउपनि. संतोष निंभोरकार, पोउपनि सुनिल गौरकार व पोलीस स्टॉफ सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment