सादिक थैम वरोरा : उपजिल्हा रुगणालय वरोरा येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असनारे ALS रुग्णवाहिकेचे तसेच पोर्टेबल एक्सरे मशिन चे लोकार्पन करन्यात आले, राज्यस्तरीय लोकार्पणसोहळा ठाणे येथे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व सार्वजनिक आरोग्य मन्त्री मा.ना.प्रकाशजी आबिटकर यांचे शुभहस्ते पार पडला
The inauguration ceremony of state-of-the-art ambulance and X-ray machine was held at the Sub-District Hospital, Warora.
ज्यामधे उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे वतिने दुरद्रुष्य प्रनाली द्वारे सहभाग नोंदवला.राज्यस्तरावर ८ कर्करोग मोबाइल वाहन,७ अत्याधुनिक रुग्णवाहिका,३८४ १०२ रुग्नवाहिका,६ डे केयर केमोथेरेपी सेंटर,२ सि.टी स्क्यान व ८० डिजिटल एक्सरे मशिन चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला,त्यापैकी १ अत्याधुनिक रुग्नवाहिका वरोरा महामार्ग NH 353E करिता व एक्सरे मशिन वरोरा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपलब्ध करुन देण्यात आली,सदर लोकार्पण सोहळा रुग्ण कल्याण समिती सदस्य खासदार प्रतिनिधी श्री.सुभाष दान्दडे यांचे अध्यक्षतेत व आमदार प्रतिनीधी श्री .बाळुभाऊ भोयर यांचे शुभहस्ते पार पडला,यावेळी व्यासपीठावर प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कन्हेरे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचन्द कन्नाके, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रफुल खुजे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ कन्नाके यांनी केले ,यावेळी त्यानी शासनाचे विविध आरोग्य योजना व उपजिल्हा रुग्णालया वरोरा येथे उपलब्ध सोइसुविधा व नविन रुग्णालय इमारतीचे आवश्यकते बाबत मत व्यक्त केले.उद्घाटनपर् बोलताना श्री.बाळुभाऊ भोयर यांनी रुग्णालय कामकाजा बाबत समाधान व्यक्त करताना,रुग्नसेवा हिच ईश्वर सेवा समजुन रुग्नाना दर्जेदार सेवा देन्याचे आव्हान सर्व् आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांना केले,आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रफुल खुजे यांनी मानले तर सुत्रसन्चालन श्री.गोविंद कुम्भारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्या करिता श्री.ओन्कार मडावी,श्री.बन्डु पेटकर,श्री.सुमित ठेंगने,श्री.अमोल भोंग,श्री.दिपक खडसाने,श्रिमती नकले,श्रिमती कोडापे,श्रिमती मीना मोगरे यांनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment