Ads

व्यसनमुक्तीसम्राट मधुकर खोडे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार

घाटंजी ता.प्र :-येथील राजे छत्रपती सामाजिक संस्था व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार व्यसनमुक्तीसम्राट तथा प्रबोधनकार मधुकरराव खोडे यांना जाहीर झाला आहे.
This year's Veer Raje Sambhaji Award goes to Madhukar Khode, the king of addiction recovery
शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक कार्य व प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विदर्भातील व्यक्तींना या पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते.
सन १५मे१९५५ मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मधुकरराव खोडे यांनी संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांना आपला आदर्श मानत ग्रामीण भागातील जनतेमध्ये व्यसनमुक्ती व ग्रामसफाईसाठी ५० वर्ष कार्य केले. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दारू, गुटखा, बिडी ,सिगारेट इत्यादी व्यसनांपासून हजारो लोकांची मुक्तता केली. आजही त्यांच्या कार्यक्रम ज्या गावात असतो तेथे सकाळी ग्रामसफाई व व्यसनमुक्तीची झोळी घेऊन ते फिरतात. या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या मध्यप्रदेश, गुजरात ,आंध्र प्रदेश या राज्यातील लोकांनीही आपल्या व्यसनांचा त्याग केला. महाराष्ट्र सरकारने दलित मित्र व सांस्कृतिक पुरस्कारने तर अमरावती विद्यापीठाने ही त्यांचा गौरव केला आहे.

शेतकरी ,काबाडकष्ट करणाऱ्या हजारो लोकांना व्यसनापासून मुक्त करून सुंदर व निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव घाटंजी येथे शिवजयंती उत्सवा दरम्यान राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये, आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्या हस्ते व पद्मश्री पुरस्कार प्राप्त नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष शर्मा ,जि.प. चे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, बँकेचे संचालक आशिष लोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
या भावपूर्ण सोहळ्याला जास्तीत जास्त शिवप्रेमींनी हजर राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment