चंद्रपुर :-पो. ठाणे रामनगर येथील खुनाच्या गुन्हयात नागपूर मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत असतांना बंदी विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी रा. इंदिरानगर चंद्रपूर हा दि. ८ मे, २०२० रोजी ४५ दिवसाच्या कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर असतांना विहीत वेळेवर कालावधीत कारागृहात परत न येता अनाधिकृतपणे फरार असल्याने त्याचेविरुध्द पो. ठाणे रामनगर येथे अप.क्र. ७९९/२०२२ कलम २२४ भादंवि प्रमाणे नोंदविण्यात आला होता.
Two prisoners absconding on leave from 2020 arrested
तसेच पो. ठाणे राजुरा येथील गुन्हयात शिक्षा भोगत असलेला बंदी नामे दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर रा. राजुरा हा सुध्दा रजेवरुन अनाधिकृतपणे फरार होता.
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हयात दि. २२/२/२०२५ ते २७/२/२०२५ पावेतो चंद्रपूर जिल्हयात फरार बंदी शोथ मोहिम राबवण्यिात आली असतांना पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे शोध पथकाने सदर फरार बंदी नामे विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी आणि बंदी नामे दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर यांचा कसोशीने शोथ लावुन त्यांना ताब्यात घेवुन संबंधीत पो. ठाणे चे स्वाधिन केले असता त्याची वैद्यकीय तपासणी करुन दोन्ही बंदी यांना मध्यवर्ती कारागह नागपुर येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि श्री दिपक कांकेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा प्रकाश बलकी, अजय बागेसर, किशोर वैरागडे, पो.अं. नरोटे व चापोहवा अराडे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment