अमरावती प्रतिनिधी : राज्यसरकार सत्तेवर येऊन शंबर दिवस पुर्ण झाले .देवेन्द फडणवीस पुर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाले. परंतु तिन महीन्यात जनतेच्या हिताचा एकही निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही.उलट महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. तिन वर्षांपासून नापीकी आहे. गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.स्त्रीयावरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. कायद्याचा धाक नाही.
सत्तेवर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते.की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, लाडक्या बहीनीना एकवीशे रुपये महिना करु. उलट दहा लाख महीला अपात्र असल्याचे सरकार सांगत आहे. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे , शेतकरी पुत्र, तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी केली आहे,जर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर केली नाही.तर शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला आंदोलन करेल. गावोगावी ग्रामपंचायत आमसभेत सर्व सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावं असं मागणी ठराव होत आहेत. सर्व आश्वासनाची, आठवण सरकारने ठेवावी व अमंलात आणावे अशी मागणी करण्यात आली जर सरकार याकडे दुर्लक्ष करेल तर उग्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी, शेतकरी पुत्र तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे..
0 comments:
Post a Comment