(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- 'लाईनमन' हा वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहेत. तो ऊन, वारा, पाऊस व इतर अत्यंत खडतर परिस्थितीतही ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास कार्यरत असतो. यांच्यामुळेच ग्राहकांना वर्षाचे सर्व दिवस अविरत वीज पुरवठा मिळतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यांचा सन्मान म्हणून 4 मार्चला 'राष्ट्रीय लाईनमन दिवस' साजरा केला जातो.
आज शहरात सिंदेवाही
येथील महावितरण उपविभागीय कार्यालय तर्फे लाइनमन दिनानिमित्त सिदेवाही शहरातून जनजागृती बाईक रॅली व शिवाजी चौकात शरबत वाटप, लाईनमन यांचा सत्कार करण्यात आले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता गायधने, कनिष्ठ अभियंता अक्षय शहारे, सहाय्यक अभियंता नवरगाव ग्रामीण धाकडे, सहाय्यक अभियंता निखारे, कनिष्ठ अभियंता पाथरी उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणारे लाईनमन, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लाईन मन दिनानिमित्त मान्यवरांची मार्गदर्शन झाले.
0 comments:
Post a Comment