Ads

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेत नवीन शिलेदार रुजू झाल्यापासून अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. या कारवाईच्या मालिकेमध्ये, गुन्हे शाखेने विना परवाना दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करून ११ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
An accused of transporting illegal liquor arrested: Local Crime Branch takes action
सविस्तर माहिती या प्रमाणे आहे की ३ मार्च रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना गुप्त माहिती मिळाली की, चंद्रपुरातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे, चंद्रपूर शहरातील वीर सावरकर चौकात नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदीदरम्यान, एमएच ३४ सीडी ७११६ क्रमांकाची मारुती अर्टिगा कार संशयास्पद स्थितीत येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये विना परवाना देशी-विदेशी दारू आणि बिअर असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय खुशाल भैयाजी बांगडे (रा. कोरपना) याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.transporting illegal liquor arrested

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत नागोसे आणि दिनेश अराडे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment