सिंदेवाही-Crime News सिंदेवाही येथे स्थानिक गुन्हे शाखेने एका दुकानात धाड टाकून अवैध तंबाखू किंमत २५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सागर प्रमोदराव केकरे रा. सिंदेवाही याचा विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना सिंदेवाही शहरातील श्री कृष्णा ट्रेडर्स दुकानाचा मालक हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ठेवत असल्याची माहिती पथकाला मिळाली, त्याआधारे पथकाने छापा टाकून २५ हजार ८५० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करून सागर केकरे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.सदर कारवाई ही दि.२ मार्च रोजी रात्री ८ वाजता केली.
गुन्हे शाखेचे पथक हे २ मार्च रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान सागर प्रमोदराव केकरे (३३), रा. सिंदेवाही हा त्याच्या आझाद चौकातील श्री कृष्णा ट्रेडर्स नावाच्या दुकानात सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे पोलिसांचे पथक सागरला सोबत घेऊन त्याचे
घर गाठून त्याची झडती घेतली. यावेळी पांढऱ्या गोण्यांमध्ये ठेवलेला बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि पान मसाला दिसला. पोलिसांनी २५ हजार ८५० रुपयांचा माल जप्त केला असून आरोपी सागर केकरे विरुद्ध बीएनएस कलम २७५,२२३, अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या कलम ५९, ३०(२), (ए), २६ (२) (आय) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, हवालदार संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, मिलिंद जांभुळे यांनी केले. या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाहीचे पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले करत आहेत.
0 comments:
Post a Comment