(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : चंद्रपूर-मूल मार्गावरील शिवाजी चौक जवळ शुक्रवारी (दि. २०) रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघातात ७४ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले. जयदेव नागोजी मेश्राम (वय ७४, रा. सिंदेवाही) असे जखमी वृद्धाचे नाव आहे, तर दुचाकीस्वाराचे नाव श्रीकांत जगन्नाथ चौधरी (वय २८, रा. सिंदेवाही) असे आहे.Bike Accident
श्रीकांत चौधरी हे त्यांच्या MH 34 BM 2346 क्रमांकाच्या दुचाकीने शिवाजी चौकातून मुख्य मार्गाने जात असताना जयदेव मेश्राम रस्ता ओलांडत होते. यावेळी चौधरी यांच्या दुचाकीने मेश्राम यांना जोरदार धडक दिली. या धडकेत मेश्राम गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
या अपघातामुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला. वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. सिंदेवाही पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0 comments:
Post a Comment