चंद्रपुर : 25 मार्च रोजी बल्लारपूर पोलिसांनी 3 युवकांना देशी बनावटीच्या पिस्तूल आणि जिवंत काडतूससह अटक केली.
The police arrested two accused with a country-made pistol and live cartridges.
पेट्रोलिंग करीत असताना बल्लारपूर पोलिसांना साईबाबा वार्ड येथे तीन आरोपिकडून बंदुकीसह जिवंत काडतुस जप्त करण्यात आले, तिघे आरोप हे चंद्रपुरातील असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे .आरोपी 24 वर्षीय अभि वाल्मिक, 24 वर्षीय विन नानाजी तावाडे व 24 वर्षीय संकेत रवींद्र येसेकर अटकेतील आरोपीचे नाव आहे.असा एकुण कि.अं.२२,०००/-रु. चा मुदेदेमाल मिळुन आल्याने पो.स्टे. ला. अप क्रं. २२४/२०२५ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करुन तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
बंदूक व जिवंत काडतुस सोबत घेऊन ते आलापल्ली जिल्हा गडचिरोली च्या दिशेने निघाले होते मात्र वाटेतच त्यांना पोलिसांनी अटक केली. सदर बंदूक बिहार वरून आणल्याची माहिती आहे
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.श्याम गव्हाणे, सपोनि. मदन दिवटे, परि.पो.उप.नि. सौरभ साळुखे, परि.पो.उप.नि. सुनिल धांडे, सफी. आंनद परचाके, पो.हवा. सुनिल कामटकर, पो. हवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, पो.हवा. संतोष पंडित, पोहवा. सत्यवार कोटनाके, पो.अं. वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, चापोअ. कैलास चिचवलकर, म.पो.अं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment