Ads

मस्तिष्क, मेंदू आणि मन यांचा उत्तम समन्वयाचे द्योतक म्हणजेच उत्कृष्ट महिला मंच... डॉ.प्रेरणा कोलते.

चंद्रपुर :-आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवार दिनांक 23 मार्च रोजी इंदिरा गांधी नाट्य सभागृहांमध्ये आयोजित उत्कृष्ट महिला मंच द्वारे आयोजित भव्य दिव्य समूह नृत्य स्पर्धा तथा कपल फॅशन शो स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ मध्ये अध्यक्ष स्थानावरून , महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाच्या सोबतच उत्कृष्ट महिला मंचच्या इतरही सर्व उपक्रमांचे भरभरून कौतुक करत असताना डॉक्टर कोलते यांनी प्रतिपादन केले .
utkrusta Mahila Manch is a symbol of the perfect coordination of the brain, the brain, and the mind... Dr. Prerna Kolte.
माजी नगरसेविका तथा उत्कृष्ट महिला मंच अध्यक्ष माननीय छबुताई मनोज वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट महिला मंच तर्फे सामूहिक नृत्य स्पर्धा तथा कपल फॅशन शो स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. महिलांचा आधुनिक पेहराव, नृत्याचे विविध प्रकार महिलांचा प्रचंड प्रतिसाद याहून अधिक अटीतटीची स्पर्धा, विविध सामाजिक विषयांवर आधारित सामूहिक नृत्य, विषयाला अनुसरून वेशभूषा, थरार उडविणारे पदलालित्य, सामाजिक समस्यांना वाचा फोडणारे ज्वलंत विषय, कपल फॅशन शोमध्ये जेष्ठ नागरिकांचा सहभाग तसेच सामूहिक नृत्य स्पर्धेमध्ये 70 वर्षां पर्यंत महिलांचा सहभाग, खऱ्या अर्थाने आयोजनाचे वैशिष्ट्य ठरले.
कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून माननीय प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक सिटी पोलीस स्टेशन, या लाभल्या तर अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रेरणा कोलते ह्या लाभल्या होत्या. उद्घाटनपर भाषणामध्ये माननीय एकुर्के मॅडम यांनी महिला सुरक्षा विषयी सविस्तर माहिती दिली तर उत्कृष्ट महिलां मंच ला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर प्रेरणा कोलते यांनी अध्यक्षीय भाषणात महिलां मंच उत्कृष्ट ठरतानाच मस्तिष्क, मेंदू आणि मन यांचा उत्तम समन्वय असे सांगत विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सौ कल्याणी किशोर जोरगेवार, डॉक्टर सुशील मुंदडा, प्राध्यापक संजय बेले, राजेंद्र भाऊ रघाताटे, पारस डेव्हलपर्स चे अमित राव , मंजुश्री कासमगोटूवार तसेच सल्लागार समितीचे एड. वैशाली टोंगे तथा सौ प्रज्ञा जीवनकर इत्यादी मंचावर उपस्थित होते. तर प्रियांश लोढीया, पुरुषोत्तम ज्वेलर्स, पारस डेव्हलपर्स , अंकित पियुष आंबटकर सोमया ग्रुप,अरविंद सोनी, श्रीकृष्ण वॉच सेंटर ,मनोज पाल, राधेश्याम अडाणी, चिराग नथवानी, सुभाष कासनगोटूवार,नंदू मामा मोगरे, पूजा दिनेश वर्मा,स्नेहल बांगडे आशिष मासिरकर,इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले.
अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये सामूहिक नृत्य स्पर्धेचे खालील प्रमाणे विजेते ठरले. वुमनिया डान्स ग्रुप प्रथम, गृही गर्ल्स डान्स ग्रुप द्वितीय ,तर डॅझ क्रीव डान्स ग्रुप तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांना अनुक्रमे 11000 ,7000,5000 रुपये रोख तसेच मानचिन्ह प्रदान करण्यात आले तसेच एकूण 12 संघांना प्रोत्साहन पर बक्षिसे रोख रुपये 2000 व मानचिन्ह देण्यात आली.
कपल फॅशन शो स्पर्धेमध्ये रोहित सुरभी गाडगे प्रथम ,अर्जुन मल्लिका कावळे द्वितीय, तर प्रशांत माधवी घोडमारे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांना अनुक्रमे /_,7000 /_व 5000 /3000/_रुपयाची रोख बक्षिसे तसेच मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. एकूण दहा जोडप्यांना रोख रुपये 2000 /_व मानचिन्ह प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आली. समूह नृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आदरणीय श्री..रत्नाकरजी शेळके,सर आशुतोष पाटील सर पुणे, जुरीमेंबर, किरण बल्की, सारिका भुते,
तर कपल फॅशन शो साठी परीक्षक म्हणून.केतन अरमरकर, नागपूर, स्मिता जावडे, जुरी, सारिका भुते, प्रणिता जुमडे इत्यादी लाभले होते. समारोपीय भाषणात उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा आदरणीय छबुताई वैरागडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच येणाऱ्या काळात महिलांसाठी विविध उपक्रमांची मेजवानी घेऊन महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून असेच विविध उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन.वैशाली कन्नमवार, धनश्री मुसने,....,... यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माननीय सौ,छबुताई वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी कार्लेकर,..स्नेहलबांगडे, मनीषा कन्नमवार, अर्चना चहारे ,माया खंनंके जयश्री साखरकर, मनीषा भाके मंगला रुद्रपवार, योगिता धनेवार अभिलाषा मैदळकर, छाया चवरे, कल्पना बडी, वैशाली कांमडे, सुषमाबेले, चंदा घोडमारे, शालिनी राऊत, रजनी हरणे,यांनी सहकार्य केले इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment