सादिक थैम वरोरा: नागपूर येथे घडलेल्या घटना संदर्भात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच आगामी विविध धर्मीय यांचे सण उत्सव निमित्याने वरोरा टाऊन मध्ये २२ मार्च २०२५ ला रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूटमार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पदमावर चौक,डोंगरवार चौक,मित्र चौक ,कामगार चौक,नेहरू चौक ते कच्छी मस्जिद ते परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पावेतो पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सह घेण्यात आला.
जातीय घटना संदर्भात जातीय सलोखा तथा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून पोलीस स्टेशन वरोरा येथे २२ मार्च २०२५ ला संध्याकाळी ७.३० ते ८.१५ वाजेपर्यंत सर्व धर्मीय प्रतिष्ठित ,जातीय संघटना पदाधिकारी ,मस्जिद.कमिटी, मौलाना,मुस्लिम प्रतिष्ठित बांधव व शांतता समिती सदस्य यांची मीटिंग घेण्यात आली.सदर मीटिंगमध्ये नागपूर येथे घडलेल्या घटना संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा,सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही पोस्ट अडिओ व्हिडिओ वर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून खात्री केल्या शिवाय ती इतर गृपवर प्रसारित करू नये तसेच त्यावर वेळीच रिॲक्ट न होता यासंदर्भात पोलिसांशी संपर्क केला पाहिजे.कोणत्याही संशयास्पद घटना संदर्भात वेळीच डायल ११२ वर तसेच पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे.असे आवाहन करण्यात आले.आगामी सण उत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्था ,जातीय सलोखा ठेवण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले.
0 comments:
Post a Comment