राजुरा 23 मार्च :-
स्थानिक बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा शाळेत नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची बाल संघटीका दुर्वा बादल बेले हिचा वाढदिवस शालेय विद्यार्थांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स व पेन्सिल वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलींद गड्डमवार, राजुरा तालुका संघटक, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांची उपस्थिती होती.
Distribution of drinking water bottles and pencils to students of Ashadevi School.
तर प्रमूख अतिथी म्हणून बादल बेले,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेफडो, विलास कुंदोजवार, नागपूर विभाग अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, सुवर्णा बेले, राजुरा तालुका महिला संघटीका, दुर्वा बेले, बाल संघटीका आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आशादेवी शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी व बालवाडीच्या एक मुलगा एक मुलगी अश्या बारा विद्यार्थांना पाणी बॉटल्स तर इतरांना पेन्सिल भेट देण्यात आल्या. दुर्वा व तिच्या परिवाराने यापूर्वी नर्सरी पासूनच वयानुसार प्रत्येक वाढदिवसाला सामाजिक उपक्रम घेण्याचा संकल्प घेतलाय. इन्फंट जिजस इंग्लीश पब्लिक स्कूल येथे ग्रंथालयाला पुस्तकं भेट, वृक्ष कुंडी भेट, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेला वृक्ष कुंडी भेट आणि बाराव्या वाढदिवसाला आशादेवी शाळेतील बारा विद्यार्थांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स व ईतर विध्यार्थीना पेन्सिल भेट देऊन वाढदिवस साजरा केला. चॉकलेट किंवा कोणताही फाजील खर्च न करता गरजूंना मदत, पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाच्या कार्यात आपण खारीचा वाटा उचलावा असे आवाहन यावेळी दूर्वाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक दिपक मडावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे चनाखा ग्रामीण अध्यक्ष दिपक सातपुते, सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, सोनल नक्षिने, नेहा तळवेकर, वैशाली बोबडे, सविता गेडेकर आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सहकार्य लाभले. या उपक्रमाविषयी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रिय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दीपक भवर, महासचिव आशिया रिजवी, महीला राज्य अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार , राज्य उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, रजनी शर्मा, सूनैना तांबेकर, युवा राज्य अध्यक्ष बबलू चव्हाण आदींनी अभिनंदन केले.
0 comments:
Post a Comment