Ads

२ अल्पवयीन मुलींवर चिमुरात अत्याचार, संतप्त जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, जाळपोळ, सौम्य लाठीहल्ला

चिमूर :-खाऊ घेऊन देण्याचे आमीष दाखवून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल (सोमवार) चिमुर शहरात उघडकीस आली. रात्री साडेदहाच्या सुमारास चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
2 minor girls raped in Chimur, angry mob pelts stones at police station, sets fire to it, uses mild lathi-charge
दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. जमावाचा रोष बघता संशयित आरोपींनी पोलिस ठाण्यात शरण आले. संतप्त झालेल्या जमावाने पोलिस ठाण्याला तब्ब्ल चार तास घेराव घालून संशयित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. रात्री तीन वाजेपर्यंत चिमुर शहरात प्रचंड तपणावपूर्ण स्थिती होती. सध्या शहरात तणावपूर्व शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुर शहरातील एका वार्डातील एक 13 व 10 वर्षाच्या दोघी मैत्रिणी होत्या. त्या सोबत शिक्षण घेत होत्या. शेजारी राहत असल्याने घरासमोर नेहमी खेळायच्या. काल सोमवारी एका 13 वर्षाच्या मुलीने रात्री साडेआठच्या सुमारास घरी बसून असताना आपल्या आईला दोघींसोबत घडलेल्या अत्याचाराच्या प्रकाराची माहिती दिली. मार्च महिण्यात दोघी मैत्रींनी दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत असताना मोहल्यातीलच संशयित आरोपी रसिद रूस्तम शेख (नड्डेवाला) याने खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलविले. दोघी मुली घरी गेल्यानंतर त्यांच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा संशयित आरोपी नसिर वजीर शेख (गोलावाला) यांनेही त्या दोघींना खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलाविले व दोघींवर अत्याचार केला. माणुसकीला काळीमा फासणार हा प्रकार दोन्ही नराधम आरोपींकडून खाऊ देण्याच्या बहाण्याने सप्टेंबर महिण्यापासून अल्पवयीन मुलींवर वारंवार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तेरा वर्षाच्या मुलीने आपल्या आईला सांगितली. त्यांनतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या आईने चिमुर पोलिस ठाण्यात जावुन तक्रार दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. दरम्यान रात्रीच या प्रकाराची माहिती चिमूर शहरात पसरल्याने या घटनेचा शहरात सर्वत्र निषेध होऊ लागला.

या प्रकारामुळे नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमा होवून या घटनेचा निषेध करू लागले. दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांपासून संभाव्य धोका लक्षात घेताच दोन्ही संशयीत आरोपींनी रात्रीच चिमुर पोलिस ठाण्यात जावून शरण घेतली. त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचा जमाव जमा झाला. रात्री साडेअकरा वाजता जमावातील काहींनी पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. त्यामुळे प्रकरण चिघळले. पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तर यामध्ये एक महिला पोलिस व अन्य एक असे दोघे पोलिस जखमी झाले.

त्यामुळे पोलिस विभागाने जमावाला पांगविण्यासाठी ठाण्यासमोर जमावावर लाठीमार केला. यामध्ये दोघे व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरला पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. तर जखमी पोलिसांवर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात आले. या दगडफेकीच्या घटनेनंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार झाल्याने जमाव संतप्त झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये या करीता अतिरिक्त पोलिस बलाची मागणी केली. भिसी, नागभीड, शेगाव येथून अतिरिकत्‍ पोलिस बल मागविण्यात आले. तर चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षकांना देण्यात आली. अडीच ते तीन वाजेपर्यंपर्यंत जमावाने ठाण्याला घेराव घालून संशयित आरोपींना आमच्या स्वाधीन करा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, लाठीमार केलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी लावून धरली.

तब्बल चार तास जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. लाठीमार झाल्याची माहिती शहरात पोहचताच पाचशे ते सहाशे नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले हेाते. त्यांनतर लाठीमार घटनेचा निषेध म्हणून पोलिस ठाण्यासमोर टायरांची जाळपोळ करून घटनेचा रोष व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलीस अधीक्षक व आप्पर पोलीस अधीक्षक, विविध पथकांसह रात्री तीन वाजण्याच्या सुमारास चिमुर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगा नियंत्रण पथकाने परिस्‍थिती हाताळल्याने तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू नियंत्रणांत आली.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment