राजुरा :- काश्मीर येथील Pahalgam पहलगाम येथे दिनांक 22 एप्रिल 2025 ला "26 निष्पाप भारतीय पर्यटकांवर " झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ आज दिनांक 27 एप्रिल ला सायं 6 वाजता,राजुरा येथील 21 विविध सामाजिक संघटना आणि व्यावसायिक संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून - संविधान चौक - पंचायत समिती जवळ राजुरा , येथे निषेध सभा आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे सामूहिक आयोजन करण्यात आले होते.
या निषेध सभेमध्ये राजुरा येथील 21 सामाजिक संस्थाच्या 150 हुन अधिक , विविध पदाधिकारी यांनी आपली संवेदना आणि मृतकांना श्रद्धांजली अर्पित केली. या हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या निष्पाप भारतीयांना मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि जखमीं असलेल्या सर्वांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना केली.
या घटनेचा तीव्र निषेध करतांना अनेकांची करूण भावना त्यांच्या मनोगतात व्यक्त झाली. अनेक मान्यवरांनी राजुरा येथील सामाजिक ऐक्य व बांधिलकीचे उदाहरणे प्रस्तुत करीत , जगातील कोणताही धर्म हा आतंकवादी विचारधारेला खत-पाणी घालणारा किंवा समर्थन करणारा नसतो ,अशी मनोगत व संवेदना व्यक्त करत या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला, व अश्या दहशतवाद्यांना धडा शिकवावा, त्यांचा खात्मा करावा अशी भावना व्यक्त केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमात ज्या 21 सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शविला त्यात जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड सिटी, राजुरा व्यापारी असोसिएशन , नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा, रोटरी क्लब राजुरा, रामबाग समिती राजुरा, राजुरा डॉक्टर्स असोसिएशन , राजुरा पत्रकार असोसिएशन लोकमत सखी मंच राजुरा, जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण संस्था राजुरा, राजुरा फोटोग्राफर असोसिएशन , पतंजली योग समिती राजुरा, स्वरप्रिती कलाअकादमी राजुरा, गुरुदेव सेवा मंडळ राजुरा, मॉर्निंग क्रिकेट क्लब राजुरा, राजुरा बार असोसिएशन, राजुरा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, सृजन नागरिक मंच राजुरा, स्वप्नपूर्ती वेलफेअर सोसायटी स्वप्नपूर्ती नगर राजुरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व रावन सेना राजुरा, राजुरा तालुका पेन्शनर असोसिएशन, जमाते इस्लामी हिंद संस्था राजुरा आणि बांधकाम कामगार वेलफेअर असोसिएशन राजुरा यांचा समावेश होता.
...
0 comments:
Post a Comment