बल्लारपूर : बल्लारपूर चे अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार, (वर्ग १) आणि सचिन रघुनाथ पुकळे, तलाठी यांना लाच मागणे चांगलेच महागात पडले असून २ लाख २० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पळताळणी करत तहसीलदार अभय गायकवाड यांना ताब्यात घेतले असून तलाठी सचिन पुकडे हे रजेवर असल्याने त्यांचा शोध घेत आहेत.
Ballarpur's Tehsildar and Talathi in the Trap of ACB
तक्रारदार हे मौजा कोठारी, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन बिल्डींग मटेरिअल सप्लायर चा व्यवसाय करतात. तक्रारदार यांची मौजा कवडजई, ता. बल्लारशाह येथे शेती असुन २३ मार्च २०२५ रोजी २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. च्या सहाय्याने त्यांचे शेतातील माती/मुरूम काढून शेताचे लेवलीग चे काम करीत असतांना कवडनई साजाचे तलाठी सचिन पूकडे व बल्लारपुर चे तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती/मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने शेतात असलेले २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. जप्त न करण्याकरीता तसेच तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता तहसीलदार यांचेकरीता २ लाख रू.
तलाठी करीता २० हजार रू. असे एकुण २ लाख रु. २० हजार रू. लाचेची मागणी केली. तसेव त्याचदिवशी तलाठी सचिन पुकडे व तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडून १ लाख १९ हजार ९०० रुपये स्विकारले. तसेच मागणी केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित १ लाख रु. देण्याकरीता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे तगादा लावण्याने तक्रारदार यांनी त्यांना होणान्या त्रासाला कंटाळून २६ मार्च २०२५ रोजी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.
प्राप्त तक्रारी वरून पडताळणी कारवाई दरम्यान तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड (वर्ग १) यांनी
दिलेल्या प्रोत्साहनावरून सचिन रघुनाथ पुकळे, तलाठी कवडजई साजा (वर्ग ३) यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती ९० हजार रू. मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवीली. त्यावरून आज ०१ एप्रिल २०२५ रोजी सापळा कारवाई करीता तक्रारदार यांना तहसीलदार अभय
गायकवाड यांचेकडे पाठविण्यात आले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यावरून आज ०१ एप्रिल २०२५ रोजी पो.स्टे.
बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असुन
तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांना ताब्यात घेण्यातआले असुन तलाठी सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने शोध पथक स्वाना करण्यात आले.
सदरची कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लावलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. रोशन चंडिका, हिवराज नेवारे, पो.अं. अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
0 comments:
Post a Comment