Ads

राजुरा येथे नकली सोने विकणाऱ्या तीन इसमावर पोलीसांची धडाकेबाज कार्यवाही.

राजुरा (ता.प्र) :-- पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत दिनांक 31/03/2025 रोजी तीन अनोळखी इसमाने फिर्यादी नामे प्रशांत बंडुजी मानुसमारे वय 42 वर्ष रा. जवाहरनगर वार्ड, राजुरा यांच्याकडे येवुन त्यांना नकली सोने हे ओरीजनल आहे असे सांगुन ते विक्री संदर्भात सौदा करुन फिर्यादीचे 5 लाख रुपयाचे आर्थीक फसवणुक केली. अशा तक्रारीवरुन पोस्टेला अप.क्र. 152/2025 कलम 318 (4), 3 (5) भा.न्या. सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. Selling  Fake Gold
Police take action against three people selling fake gold in Rajura.
राजुरा पोलीसांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) भानुदास बाबुराव बंजारा वय 40 वर्ष, रा.वसरनी, ता. जि. नांदेड, 2) भगवान सदाशिव कांबळे वय 55 वर्ष, रा. वडगाव रोड मुलकी, ता.जि.यवतमाळ, 3) मतीन अमीर शेख वय 59 वर्ष रा. सावरगड, ता.जि.यवतमाळ यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नगदी 5 लाख रुपये व एक विवो कपंनीचा मोबाईल कि.अं 10,000/- रु तसेच फिर्यादीकडुन नकली सोना कि. अं 1000 असा एकुण 5,11,000 रु चा माल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी परी. सहा. पोलीस अधिक्षक तथा ठाणे प्रभारी अधिकारी श्री. अनिकेत हिरडे भा.पो.से यांचे कुशल नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनी रमेश नन्नावरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा अनुप डांगे, पो. अं योगेश पिदुरकर, पो. अं महेश बोलगोडवार, पो. अं शरद राठोड, पो. अं आकाश जाधव यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment