चंद्रपुर :-दिनांक 31 मार्च 2025 रोजी फिर्यादी श्री व्यंकटेश्वर रामण्णा रेड्डी प्रोजेक्ट मॅनेजर, कावेरी C5 JV कंपनी, WCL ओपन कास्ट भटाळी यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिले की, त्यांच्या कंपनीच्या एच आर यांनी एका अल्पवयीन बालकास कामावर ठेवले होते.
Case registered against those demanding extortion from the project manager of Cauvery Company at WCL Open Cast Bhatali
सदर बाब त्यांचे लक्षात येताच, त्यांनी सदर मुलास कामावरून कमी केले, म्हणून सदर मुलाची आई आणि विक्रांत सहारे हे त्यांचे कंपनीत येऊन मुलाला मारहाण का केली असे खोटे आरोप करून कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे तक्रार नोंदवली. यावरून कंपनीचे मॅनेजर आणि HR हे विक्रांत सहारे यांचे कार्यालयात जाऊन सदर खोटी तक्रार का केली अशी विचारणा केली असता विक्रांत सहारे यांनी आता माझा इगो हर्ट झाला आहे मला पाच लाख रुपये द्या आणि माझ्या दहा लोकांना कामावर ठेवा अन्यथा मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन कंपनीची बदनामी करेल अशी धमकी दिली. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 271/2020 कलम 308(2), 351 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये विक्रांत सहारे यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या रास्त मागण्याकरीता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.
तसेच जिल्हयातील सर्व उद्योग धंदे व व्यवसायीक यांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही कायदेशीर कामकाजात त्यांना बेकायदेशीर अडथळा निर्माण करत असेल, खंडणी मागत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क साधुन तक्रार दयावी, संबंधीतांविरुध्द तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल
0 comments:
Post a Comment