Ads

फेसबुक स्टार्स विलास झटटे कळमन्यात : विविध उपक्रमांची पाहणी करून सरपंच नंदकिशोर वाढई आणि गावकऱ्यांचे केले कौतुक.

राजुरा (ता.प्र) :- राजुरा तालुक्यातील आदर्श गाव मौजा कळमना येथे फेसबुक स्टार्स विलास झटटे यांनी भेट देऊन येथील उपक्रमशील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने गावात सुरू असलेल्या विविध उपक्रम तथा राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांची पाहणी केली.
Facebook stars Vilas Jatte in Kalamna: Sarpanch Nandkishore Vadhai inspected various activities and praised the villagers.
बचतगटांच्या महीलांनी व ग्रामस्थांनी फेसबुक स्टार्स विलास झटटे यांचे स्वागत केले. यानंतर विलास झटटे यांनी सरपंच व गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची व विकासकामांची माहिती घेतली. तसेच विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून गावातील लोकप्रतिनिधी उपक्रमशील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी कामांचे कौतुक केले. फेसबुक स्टार्स विलास झटटे यांच्या भेटीमुळे संपूर्ण कळमनावाशी नागरिक भारावून गेले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रा. प. रंजना पिंगे, सुनीता उमाटे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, निलेश वाढई तंटामुक्ती अध्यक्ष कळमना, ग्रामसेवक सिताराम मरापे, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान कमिटी कळमना, माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेंडे, मुख्याध्यापिका दुधे, जेष्ठ नागरिक डॉ. लटारी बल्की, कवडु पाटील पिंगे, आनंदराव पाटील बोढाले, बापुजी पाटील वाढई, शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, वनिता गौखरे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विठ्ठल राव वाढई, सुरेश गौरकार, उध्दव ताजने, वसंता सपाट, शंकर गेडाम, सुनील बोढाले, मदन वाढई, अमोल निमकर, अमोल कावळे, विठ्ठल विदे, संतोष बल्की ग्रामसघ अध्यक्ष मीना ताई भोयर यासह कळमना ग्रामसंघ तसेच महिला बचतगट च्या महिला, स्थानिक नागरिक, पालक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment