सचिन पाटील प्रतिनिधी :-
आखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नुकत्याच जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर चंद्रपूर येथे मेणबत्ती लावून मौन बाळगून श्रद्धांजली देण्यात आली.
Tributes to the martyrs of Pahalgam on behalf of the All India Republican Party.
यावेळी प्रवीण खोब्रागडे यांनी भारतातील सर्व पर्यटनस्थळांवर विशेषतः सीमा भागातील शहरात केंद्र व राज्य सरकारने यात्रेकरूंना सुरक्षा प्रदान करावी असे आवाहन केले. पहेलगाम येथील दहशतवादी हल्यात अडकलेले चंद्रपूर येथील युवक अंकित नगराळे यांनी आपला थरारक प्रसंग सांगितलं आणि काश्मिरी नागरिकांनी सर्व पर्यटकांना सर्व प्रकारची मदत केल्याचे सांगितले.
याप्रसंगी आखिल भारतीय पक्षाचे पद धिकरी विषालचांद्र अलोणे, राजू खोब्रागडे, प्रतीक डोरलीकर, प्रेमदास बोरकर, ऍडव्होकेट राजस खोब्रागडे, सचिन पाटील, दिलीप डांगे, शंकर व्हेलेकर, कैलाश शेंडे, केशव रामटेके, महादेव कांबळे, निरंजन ढोले, हर्षल खोब्रागडे, हेमंत खोब्रागडे, मिलिंद रंगारी, अनिल आलोने, स्वप्नील नगराळे, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, पंचफुला व्हेलेकर उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment