Ads

अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर वन विभागाने केले जप्त

जावेद शेख भद्रावती :- दिनांक 5/04/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता (अंदाजे) भद्रावती वनपरिक्षेत्रातील तिरवंजा व मासळ नियतक्षेत्रामधील अवैधरित्या वाळु (रेती) उत्खनन करून वाहतुक करत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारे
Forest department seizes four tractors transporting illegal sand
मा. श्री. प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी चंद्रपुर व मा. विकास श्री. तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), चंद्रपूर वनविभाग, चंदपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. के. डब्ल्यु. धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांचे नेतृत्वात क्षेत्रीय वनकर्मचारी राखीव वनाकडे गेले असता त्यांनी श्री. ओम किशोर पिंपळकर रा. तिरवंजा ता. भद्रावती यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक 1: MH-34-BF-2523 व ट्रॉली क्रमांक MH-34-AP-2492 व श्री. अनुराग देवराव येरगुडे रा. तिरवंजा यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक 2:- MH-33-F-4014 व ट्रॉली क्रमांक MH-34-BV-6793, व श्री. रुपेश बाबुलाल उईके रा. आष्टी ता. भद्रावती यांच्या मालकीचे महिंद्रा 475 DI सरपंच ट्रॅक्टर क्रमांक 3: MH-34-CD-4698 (रंग लाल) व ट्रॉली:- नंबर क्रमांक नसलेली (रंग निळा), महिंद्रा YUVO TECH 548 DI ट्रॅक्टर क्रमांक 4:- नंबर क्रमांक नसलेला (रंग लाल), व ट्रॉली नंबर क्रमांक नसलेली (रंग लाल), ने शासकीय वनातील राखीव वन कक्ष क्रमांक 203 नियतक्षेत्र तिरवंजा व कक्ष क्रमांक 219 नियतक्षेत्र मासळ मधील नाल्यातुन अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले असता ट्रक्टर वरील वाहन चालक यांना त्यांचेकडे रेती उत्खनन व वाहतुक परवानाबाबत कागदपत्र असल्यास दाखवण्यास सांगीतले असता. त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे दिसुन आले. तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आणि वाहन मालकावर वनगुन्हा नोंदविण्यात आला. सदर कार्यवाहीत श्री. व्ही. व्ही शिंदे क्षेत्र सहाय्यक भद्रावती, श्री. ए. बी. शेळकी क्षेत्र सहाय्यक मासळ, श्री. एस. एस. मेश्राम वनरक्षक मासळ, कु. जे. एम. माहुलीकर वनरक्षक तिरवंजा, श्री. डी. एम. गेडाम वनरक्षक भद्रावती, श्री. पवन मांढरे, श्री. नितिन राऊत. श्री. अनिल शेंद्रे, श्री. किशोर मडावी, व श्री. विकास धांडे, यांनी मोहीम यशस्वी केली. तसेच अवैधरित्या वाळु (रेती) उत्खनन टाळण्याच्या दृष्टीने यापुढेही शोधमोहीम सुरू राहील.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment