चंद्रपूर - crime news शहरात दिवसेंदिवस ड्रग्सचे प्रसाण वाढत असूने शुक्रवारी (दि 25) आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. हनिफ करीम शेख असे त्याचे नाव असून तो इंदिरानगर येथील रहिवासी आहे. हनिफ करीम शेख चंद्रपूर शहरातील पो. स्टे. रामनगर हद्दीत विक्री करण्याकरिता म्फोडूिंत्र (M.D.)Drugs हा अमली पदार्थ बाळगून होता. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी हनिफुच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना एम डी ड्रग आढळून आले. हनिफ शेख विरुद्ध स्था.गु.शा. चंद्रपूर ने कारवाई केली.
सदर कारवाई मध्ये 165000 रु किमतीचे 33.04 ग्रॅमन एमडी ड्रग जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र. 323/25 कलम 8 (क), 22(ब) एनपीडिएस कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, संतोष निंभोरकर, स्वामीदास चालेकर, प्रकाश बलकी, किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, संतोष येलपुलवार, प्रमोद कोटनाके, नितीन रायपूरे, गोपीनाथ नरोटे, मिलिंद जांभुळे, प्रमोद डंभारे यांनी केली.
व
0 comments:
Post a Comment