Ads

पोलीस शिपाईवर मद्यपींचा हल्ला.

चिमूर : भिसी येथे एकालग्न समारंभात आलेल्या काही युवकांनी बिअरबार मध्ये आपसातच वाद घातला. थोड्यावेळात वादाचं रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान पोलीसांची गाडी आली व वाद घालणाऱ्या युवकांना पोलीसांनी गाडीत बसण्यास सांगीतले, परंतू काही मद्यपी युवकांनी पोलीस गाडी चालक मनोज गायकवाड यांना मारहाण करण्यास सुरवात केली. पोलीस शिपायाला होणारी मारहाण रोकण्यासाठी गेलेल्या भिसी येथील पत्रकार पंकज मिश्रा यांना सुद्धा थक्काबुक्की करून मारहाण केली.
Police constable attacked by drunkards.
काही वेळात भिसी पोलीस स्टेशनचे ठानेदार वाघ व अन्य पोलीस शिपाई घटना स्थळावर येवून पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या युवकांना अटक केली.

भिसी येथे लग्न समारंभात वर पक्षाकडून आलेले काही युवक येथील आशिष बिअर बार मध्ये येऊन मद्यप्राशन करीत बसले. दारू पितांना त्यांच्यात आपसातच वाद सुरू झाला. व थोड्या वेळात बारसमोर रस्त्यावर येवून अश्लील शिवीगाळ करून हाणामारी करू लागले. काही वेळात बिअर बार चालकाने येथील पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहीती दिली. व लगेच पोलीस गाडी घटनास्थळावर दाखल झाली. पोलीस शिपाई मनोज गायकवाड यांनी हाणामारी करणाऱ्या युवकांना गाडीत बसण्यास सांगताच मद्यप्रशासन केलेल्या युवकांनी पोलीस शिपायाला मारहाण करण्यास सुरवात केली. दरम्यान भिसी येथील पत्रकार पंकज मिश्रा हे आपल्या कापड दुकानामधून सर्व घटना बघत होते. त्यांनी मध्यस्थी करून घडणारा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता युवकांनी त्यांना सुद्धा धक्काबुक्की करून मारहाण केली. नंतर पंकज मिश्रा यांनी लगेच पोलीस ठाण्यात जाऊन ठानेदार रवींद्र वाघ यांना माहीती दिली. वाघ यांनी लगेच अन्य पोलीस शिपायांसह घटना स्थळ गाठून पोलीसांना मारहाण करणाऱ्या युवकांना अटक केली. पोलीसांनी अशिष बिअरबार चे सिसीटीव्ही तपासुन घटना स्थळावरून फरार झालेल्या इतर युवकांना सुध्दा अटक केली. 
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विकास गोपाल नंदुरकर (३३), मनीष उर्फ शिवम लक्ष्मण गजपुरे (१९), विनोद उर्फ सर्वेश सुरेश ढोमणे (२६), होमराज सुधाकर ढोमणे (२५), स्वप्निल अमृत करंडे (२६), संदीप अमृत करंडे (२९), मुन्ना राजू बाळबुदे (२४), साहिल ज्ञानेश्वर भूडे (२५) सर्व रा. पेंढराबोडी तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर व सूर्यभान ईश्वर चौधरी (३९) रा. दुर्गापूर यांचेवर कलम १३२, १२१(१), १८९, १९०, १९१(२), ३५१(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
 सदर गुन्ह्याचा पुढील तपास भिसीचे ठाणेदार जितेन्द्र चांदे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुकेश थोबळे व पो. उप. रवीद्र वाघ हे करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment