जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती नगरपरिषदच्या घंटागाडी निविदा प्रकरणी सीएलएफ तसेच सीआरपीच्या अध्यक्षांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रपरिषदशी तसेच त्यावेळी केलेल्या आरोपांशी आमचा संबंध नसल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत योगिता टोंगे आणि उपस्थित महिलांनी दिली.
Women office bearers misled us: Women's self-help group alleges in press conference
दि.२९ मार्चला गवराळा येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत
सीएलएफच्या अध्यक्ष अनिता शहा व सीआरपीच्या मानसी देव आणि तृप्ती हिरादेवे त्यांनी आम्हास अंधारात ठेऊन ही पत्रपरिषद घेतली. त्यात घंटागाडी निविदा प्रकरणी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी आणि शहर अभियान व्यवस्थापक ज्योती लालसरे यांच्यावर दोषारोपण केले. ते चुकीचे आहे. मुख्याधिकारी शेळकी तसेच लालसरे या दोघीही आम्हास नेहमीच सहकार्य करीत असल्याचे महिला बचत गटाच्या पदाधिकारी तसेच सदस्य महिलांनी पत्र परिषदेत सांगितले. शहा,देव आणि हिरादेवे यांनी आम्हास अंधारात ठेवून आमच्या उपस्थितीत त्यावेळेस घेतलेल्या पत्र परिषदेत मुख्याधिकारी व शहर अभियान व्यवस्थापकावरील केलेला आरोप खोटा आहे.यास आमची सहमती नाही. असे त्यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी विविध महिला बचत गटाच्या योगिता टोंगे,अनु पिंपळकर, गीता हमदापुरे, ज्योत्स्ना कवासे, प्रियंका करमरकर, कीर्ती लोखंडे, प्रतिभा रायपूरे,पलक धाडसे, गीता ठाकरे, जयश्री भगत, हर्षदा महाकुलकर,रत्नमाला खडसे, आशा पढाल, कल्पना खंडाळकर, मोहना वैरागडे, जिजा चुनारकर सविता पढाल आणि इतर महिला उपस्थित होत्या.
0 comments:
Post a Comment