Ads

LCB चा जुगार अड्ड्यावर छापा, ११ आरोपींसह ३ लाख १९ हजारांचा माल जप्तLCB raids gambling den, seizes goods worth 3 lakh 19 thousand including 11 accused

चंद्रपुर : स्थानिक गुन्हे शाखा (LCB) च्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीवरून भिसी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा चक वाघाई तलाव जंगल परिसरात छापा टाकून एकुण 11जुगार बहाद्दराना 52 पत्त्यावंर जुगार खेळताना मिळून आले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये जुगाराच्या डावावर तसेच मोबाईल व 3 मोटार सायकल असा एकूण 3 लाख, 19 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
LCB raids gambling den, seizes goods worth 3 lakh 19 thousand including 11 accused
सदरची कारवाई 18 मे रोजी LCB च्या पथकाने केली असून जूगार खेळणारे 11 इसमांविरुध्द पोलीस स्टेशन भिसी येथे अपराध क्रं.67/2025 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणी भिसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांच्या नेतृत्वात पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउनि. सुनिल गौरकार, पोहवा. नितीन कुरेवार, नितीन साळवे, जय सिंह, गणेश मोहुर्ले, नापोअं. संतोष येलपुलवार, पोअं. गणेश भोयर, गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment