जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
सध्या भद्रावती महसूल विभागाद्वारे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती तस्करीच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याने रेती तस्करांचे धाबे चांगले दणाणले आहे.
महसूल विभागाद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. सदर कारवाई महसूल विभागाद्वारे दिनांक15रोज गुरुवारला सकाळी सहा वाजता तालुक्यातील मांगली गावाजवळ असलेल्या रेती घाटातकरण्यात आली. सदर ट्रॅक्टर नंबर एम एच 34 cd,--0112नंबर व ट्रॉली या ट्रॅक्टर द्वारे दिवसावेळेस एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे मांगली नाल्यावरआढळून आल्याने सदर ट्रॅक्टर वरकारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्ट घनश्यामर उताणे राहणार मांगली यांच्या मालकीचा आहे. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात ग्राम महसूल अधिकारी खुशाल मस्के यांनी ट्रॅक्टर वर कारवाई करून पथक बोलविण्यात आले ही कारवाईनायबतहसीलदार सुधीर खांडरे, मंडळ अधिकारी अनिल डडमल, ग्राम महसूल अधिकारी मुरकुटे, ड्रायव्हर बंडू बेलपुलवार यांनी केली.
0 comments:
Post a Comment