राजुरा १५ मे :-
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सूसंस्कार शिबिर दिनांक ६ मे ते १६ मे पर्यंत राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरातील उपासक - उपासिका शिबीरार्थी यांची रामधून प्रभातफेरी राजुरा शहरातून मुख्य मार्गानी काढण्यात आली.
The Shri Gurudev Residential Comprehensive Child Welfare Campers took out a morning procession from Rajura city.
यावेळी महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतिबा फुले, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यारपण करून अभिवादन केले. तसेच गजानन महाराज मंदिर, गणेश मंदीर येथे पूजन करण्यात आले. मुख्य मार्गांनी आकर्षक रांगोळ्या काढून व स्वच्छता जनजागृती आणि समाजसुधारक, क्रांतिकारक, देशभक्तांच्या नाम जयघोषाने राजुरा नगरी दुमदुमली. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी शिबिरार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी केशव ठाकरे, नंदकिशोर वाढई, सरपंच, ग्रा.पं. कळमना, मयूर बोनगिरवार, मोहनदास मेश्राम, सेवाधिकारी, गुरूदेव सेवा मंडळ राजुराचे ह.भ.प. शैलेश कावळे, सूरेश बेले, स्वामिनी गौरीताई विटोले, नागपूर, दादाजी झाडे, रामप्रसाद बुटले, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, रामाजी घटे, प्रकाश उरकुंडे, देविदास वांढरे, प्रमोद साळवे, अनिल चौधरी, राजेंद्र मालेकर, परशुराम साळवे, उत्तम अवघडे, उज्वल शेंडे, गणेश कुडे, रामदास चौधरी, मारोतराव सातपुते, बाळासाहेब गोहोकार, लोमेश मडावी, प्रतिभा बोढे, नलिनी मेश्राम, सुवर्णा कावळे, अश्विनी वांढरे, शांताबाई लांडे, विमलबाई उरकुंडे आनंदराव वडस्कर, गोपाळा बुरांडे तसेच राजुरा तालुक्यातील शेकडो गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश उरकुंडे यांनी केले. तर आभाप्रदर्शन मोहनदास मेश्राम यांनी मानले.---------------------------------------------
देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र
श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर राजुरा शहरात प्रथमच होत असुन लहान वयातच चांगले सुसंस्कार, देश सेवा, स्वच्छता जनजागृती, स्वरक्षण, योगासने, प्राणायाम, लाठीकाठी, शारीरिक- बौद्धिक मार्गदर्शन आदी विषयांवर सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळें भविष्यातील सृजान व जागरुक नागरिक निर्माण करून कर्तव्याची जाणीव व्हावी ही भावना नक्कीच पूर्णत्वास येईल अशी भावना आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली. तसेच भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती वर भास्य करीत राजुरा येथे दि . १६ मे रोजी सायंकाळी राजुरा तालुक्यात भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्याकरीता व त्यांच्या शौर्य, समर्थनात भव्य सर्वसमावेशक तिरंगा यात्रा निघणार असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
0 comments:
Post a Comment